म्हसळा नगरपंचायतीची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल

| म्हसळा | वार्ताहर |

स्वच्छतेतून समृध्दीकडे वाटचाल करीत असताना म्हसळा शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी म्हसळा नगरपंचायत सातत्याने पाठपुरावा करून हाती घेतलेल्या स्वच्छता पंधरावड्यातील मोहिमेत नगरपंचायत कार्यालय ते सफिया मंजिल येथील साफसफाई व अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली.

सदर मोहिमेत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती सुमय्या आमदानी, नगरसेवक शाहिद जंजिरकर, नगरपंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी वृक्ष संवर्धन व लागवड करून साफसफाई मोहिमेत नगरपंचायत कार्यालय ते सफिया मंजिलपर्यंत रस्ते साफसफाई, गटार सफाई, अनधिकृत बॅनर हटविणे, रस्त्यालगतची झुडपे छाटणी करणे, स्वच्छ्ता केलेल्या गटारांमध्ये कीटकनाशक फवारणी करणे, अनधिकृत अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाई, रस्त्यावरील खड्डे भरणे आदी स्वच्छ्तेची पूर्तता करण्यात आली.

Exit mobile version