म्हसळा पोलीस हायअर्लटमध्ये

| म्हसळा | वार्ताहर |

हरिहरेश्‍वर येथे सापडलेल्या संशयित बोटीच्या पार्श्‍वभूमीवर म्हसळा तालुक्यात पोलिसांनी जागते रहोचा नारा दिला आहे. श्रीवर्धन उपविभागातील श्रीवर्धन, दिघी सागरी आणि म्हसळा ही तीनही पोलीस स्टेशन विशेष अलर्ट मध्ये आली आहेत.

1993 मध्ये श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडीला आरडीएक्स उतरवून ते म्हसळामार्गे मुंबईला नेले होते. शेखाडी श्रीवर्धनपासून केवळ 7 किमी अंतरावर आहे तर हरिहरेश्‍वर श्रीवर्धन पासून 14 किमी अंतरावर आहे. त्याचे गांभीर्य गृह विभागाने घेतले आहे.

या स्फोट प्रकरणात श्रीवर्धन- म्हसळ्यातील आरोपींचा मोठा सहभाग होता. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून म्हसळा तालुक्यात 4 चेकपोस्ट ची निर्मीती करण्यात आली होती. त्यामध्ये साईचेक पोस्ट, वांगणी आणि कोळे ही तीन, तर गोरेगांव पोलीस स्टेशन अंर्तगत आंबेत अशी चार चेक पोस्ट कार्यरत आहेत ती सर्वच विशेष सर्तक झाली आहेत. सर्व चेकपोस्टवर जाणार्‍या-येणार्‍या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे, असे म्हसळा पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक उध्दव सुर्वे यानी सांगितले.

Exit mobile version