दूध महागले

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था ।

देशातील दोन अग्रगण्य दुधाचे बँड असलेल्या अमूल दूध आणि मदर डेअरीने दुधाच्या किमतीत दोन रुपये प्रतिलीटरने वाढ केली आहे. ही दरवाढ 17 ऑगस्टपासून होईल, असं या कंपन्यांनी अधिकृतरित्या जाहीर केले आहे. या दरवाढीमुळं ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण पडणार आहे. गुजरात सहकारी दूध विपणन फेडरेशन अर्थात अमूल डेअरीनं दुधाच्या दरवाढीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मार्किटिंग विभागाकडून दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद, सौराष्ट्र, दिल्ली एनसीआर, पश्‍चिम बंगाल, मुंबई आणि इतर ठिकाणी अमूलच्या दुधात 17 ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

Exit mobile version