। नागोठणे । प्रतिनिधी ।
दूध डेअरी धंद्यामध्ये नेहमी आलेली खोट आणि त्यामधून झालेले नुकसान तसेच दूध डेअरी धंद्यातून झालेले कर्ज यामुळे नैराश्य येऊन नागोठण्यातील एका दूध विक्रेत्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या मृत व्यक्तीचे नाव महेश अशोक नलावडे (52) असे असून, ते नागोठण्यातील आंगर आळी भागातील जोगेश्वरी रेसिडेन्सी इमारतीमध्ये राहत होते. आत्महत्येची ही घटना गुरुवारी (दि. 20) रात्री साडे सात ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. आपल्या राहत्या घरातील बेडरूमच्या छताच्या सीलिंग फॅनला कुत्र्याच्या गळ्यात बांधतो त्या पट्ट्याने गळफास घेऊन महेश नलावडे यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली असून, अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. दया पाटील या करीत आहेत.
नागोठण्यात दूध विक्रेत्याची आत्महत्या
