| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलच्या तहसीलदारपदी मिनल भामरे यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारच्या महसूल खात्याने काढले आहेत. त्यानुसार त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पनवेल परिसरात असलेल्या मॅरेथॉन बिल्डरला दिल्या गेलेल्या अकृषिक जमिन दाखल्याप्रकरणाचा ठपका ठेवत तत्कालीन तहसीलदार विजय पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली आहे. त्यांना या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात सेवेत रुजू करून घेत त्यांचा पदभार अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान, शासनातर्फे मिनल भामरे यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून त्यांचे प्रांतधिकारी पवन चांडक यांनी पुष्पगुच्छ अभिनंद केले.
पनवेल तहसीलदारपदी मिनल भामरे
