मिनी विधानसभा फेब्रुवारी महिन्यात?

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह 17 महानगर पालिका, 27 जिल्हा परिषदा 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणूकीचे पडघम देखील वाजण्यास सुुरुवात झाली आहे.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. पण, आता फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्याच अनुषांगाने प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या सर्व नेते, मंत्री आणि आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. काल श्रीवर्धन तालुक्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याने याला बळकटी मिळाली आहे.
लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये 10 पालिकांची मुदत संपणार आहे तर 100 नगरपालिकांची मुदत संपत आहे. या दरम्यान कोविडची परिस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सर्वच्या स्थानिक निवडणुका या फेब्रुवारीमध्ये होतील हे निश्‍चित झाले आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यासह 17 महानगर पालिका, 27 जिल्हा परिषदा 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे, एका प्रकारेही मिनी विधानसभेची निवडणूक समजली जाणार आहे.

Exit mobile version