दैव बलवत्तर 20 लोकांचे जीव वाचले
| आंबेत | वार्ताहर |
मुंबईहून दापोलीकडे निघालेल्या एका मिनी बसचा (क्रमांक एमएच 48 ए वाय 6233) ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची घटना शुक्रवार, दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली. यावेळी या बसमध्ये 20 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती बसचालक रितेश तानावडे यांनी दिली.
घाटात नव्याने लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे ही बस खोल दरीत जाता-जाता वाचली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशी माहितीदेखील वाहन चालकाने दिली.