नाना पटोलेंनी दाखवलं पेन ड्राईव्ह
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सध्या हनी ट्रॅपची गरमागरम चर्चा आहे. यामध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. त्याचबरोबर आजी आणि माजी मंत्रीही यामध्ये अडकले असल्याचा दावा केला जातोय. मंत्रालय, मुंबई. ठाणे आणि नाशिकमधले अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये फसलेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत गुरुवारी (दि.17 जुलै) याबाबतचा पेन ड्राईव्ह दाखवतच खळबळ उडवून दिली आहे. ठाणे आणि नाशिकमध्ये महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. या हनी ट्रॅपचं जाळं मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये पसरल्याचं मानलं जात आहे. या हनी ट्रॅपमध्ये राज्यातले एकूण 72 सरकारी अधिकारी सापडल्याचा आरोप आहे.






