मिनीट्रेनचे डब्बे दुरुस्तीसाठी कुर्डुवाडीत

। नेरळ । वार्ताहर ।
पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन अद्याप नॅरोगेजवर आलेली नाही. मात्र या मार्गावर अमन लॉज ते माथेरान स्टेशन या दरम्यान मिनीट्रेनची शटल सेवा चालविली जात आहे. त्यामुळे पर्यटकांना मिनीट्रेनचा आनंद देखील घेता येत असतो. मात्र त्याच मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे आणखी आकर्षक असावेत आणि मजबूत असावेत यासाठी त्यांचे सर्व्हिसिंग दरवर्षी केली जाते आणि त्या कामासाठी हे प्रवासी डब्बे नेरळ लोको येथून कुर्डुवाडी येथील कारशेडमध्ये पाठवले जातात.

नेरळ माथेरान मिनीट्रेन न थकता 115 वर्षे पर्यटक प्रवासी यांच्या सेवेत आहे.त्या मिनीट्रेनच्या नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर दुरुस्तीची कामे सुरु असून त्यासाठी नेरळ- माथेरान मार्गावर मिनीट्रेनची प्रवासी सेवा चालविली जात नाही. माथेरान स्टेशन ते अमन लॉज या दरम्यान मिनीट्रेनची शटल सेवा चालविली जाते. त्या सर्व मिनीट्रेन गाड्यांसाठी लावणारे जाणारे प्रवासी डब्बे यांची दुरुस्ती दरवर्षी मध्य रेल्वेकडून केली जाते. त्यात ते प्रवासी डब्बे यांची दुरुस्तीची कामे नेर येथील लोको मध्ये केली जात असल्याने प्रवासी डब्बे हे नेरळ येथून पुणे विभागातील कुर्डुवाडी येथील मध्य रेल्वेच्या कार्यशाळेत नेले जातात. पावसाळ्यात हि कामे दरवर्षी रुटीन कामे प्रमाणे सुरु असतात. त्या ठिकाणी प्रवासी डब्बे यांची रंगरंगोटी तसेच चित्रे चिटकवणे,दुरुस्तीची कामे केली जात असतात. त्यासाठी नेरळ लोको मधून मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे नव्याने सजण्यासाठी नेले जात असून ऑक्टोबरमध्ये मिनीट्रेनच नवीन हंगाम सुरु होण्याआधी हे सर्व प्रवासी डब्बे नव्याने सुरु होणार्‍या पर्यटन हंगामासाठी सज्ज होऊन येणार आहेत.

Exit mobile version