अल्पवयीन मुलावर अत्याचार; मौलानाला बेड्या

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षीय निष्पाप मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी एका मौलानाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, आरोपी मौलानावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

हा मौलाना व पीडित मुलगा हे दोघेही एकाच परिसरात राहतात. पीडित मुलगा आपल्या परिसरात खेळत असताना या मौलानाने पीडित मुलाला दुचाकीवरून फिरवून आणण्याच्या बहाण्याने घेऊन गेला व त्याला खारघर मधील फुटबॉल ग्राऊंडच्या मागील मोकळ्या मैदानात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या घटनेची माहिती पीडित मुलाने त्याच्या पालकांना दिल्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या मौलाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Exit mobile version