। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनीतील सध्या वावेघर येथे राहणारा साहिब जहिद दिवाण (13) हा मोहोपाडा येथील मोबाईलच्या दुकानात जातो असे सांगून घरातून निघून गेला. तो अल्पवयीन आहे, हे माहीत असून सुद्धा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. त्याची आई सलमा खातून जाहिर दवाण हिने सर्वत्र शोध घेतला तो मिळून न आल्याने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. साहिब हा अंगाने सडपातळ असून, त्याची उंची साडेचार फुट आहे. रंग गोरा, काळी पॅन्ट, काळ्या रंगाची हुडी टी-शर्ट, पायात चप्पल-असे वर्णन आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







