| वावोशी | जतिन मोरे |
खालापूर पोलीस ठाणे हद्दीत (दि.12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मौजे वावोशी ते आजीवली या प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी आला खालापूर पोलिसांनी अटक केले असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे करीत आहेत.
महाराष्ट्रात मुलींच्या छेडछाड, विनयभंग व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, याबाबत पोलीस प्रशासन कारवाई करीत असतानाही काही आरोपी अजूनही कोणत्याही कारवाईला न घाबरता मुलींवर दबाव टाकत वेगवेगळे स्वरूपातून अत्याचार करीत आहेत. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.12) वावोशी ते आजीवली या प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये आरोपी लखन सुनील वाघेला, (30) रा.भिसेगाव, ता.कर्जत, याने पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे, हे माहिती असताना सुध्दा त्यांनी घाणेरड्या हेतुने पिडीत मुलगी हिचे हाताला स्पर्श करुन तसेच बसमधील इतर मुलींनाही घाणेरडया हेतुने स्पर्श करुन त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पिडीत मुलगी व इतर मुली यांचा विनयभंग केल्याने या घटनेतील आरोपीस खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे करीत आहेत.







