अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

। रसायनी । प्रतिनिधी ।

खालापूर तालुक्यातील वडगाव आदिवासीवाडी परिसरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 26 मे 2026 ते 26 जून 2026 या कालावधीत वडगाव आदिवासीवाडी येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या बहिणीचा दीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीने पीडित मुलीशी वारंवार जवळीक साधून ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याने ती गर्भवती झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अधिकारी मपोसई / हे करीत आहेत.

Exit mobile version