बँकेची फसवणूक करून रकमेचा अपहार

। पनवेल । वार्ताहर ।

बँकेची फसवणूक करून दीड लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महिलेविरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी या स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन पनवेल शाखेत शाखा व्यवस्थापक आहेत. या शाखेमध्ये 2008 ते 2009 दरम्यान फसवणूक करणारी महिला लोन डिपार्टमेंटमध्ये काम करत होत्या. या शाखेत फिलिप कुंवर आणि अलका राऊत यांच्या जॉईंट नावावर टर्म डिपॉझिट रक्कम तीन लाख 31 हजार 286 ही 12 महिन्यांच्या मुदतीसाठी ठेवली होती. या टर्म डिपॉझिट रिसीटवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, बुधेल, गुजरात या बँकेकडून तीन लाख 21 हजारांचे डिमांड कर्ज घेतले आहे.

टीडीआरवर डिमांड कर्ज घेतलेल्या असल्यामुळे पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेकडून नव्याने कर्ज घेऊ शकत नाही असे असताना त्या महिलेने स्टेट बँक ऑफ इंडिया, नवीन पनवेल या बँकेत डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत असताना पदाचा दुरुपयोग करून व बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने टर्म डिपॉझिट रिसीटच्या आधारे व त्याचा गैरवापर करून नवीन बोगस व खोटे डिमांड कर्ज खाते 2009 रोजी कम्प्युटर राईज सिस्टीममध्ये तयार केले आणि डिमांड खर्चाकरता खोटे व बोगस असे कर्ज प्रकरण तयार करून त्यावर आरोपीने तिच्या हस्ताक्षरात भरले आहे. कर्ज रक्कम दीड लाख ही त्याच वेळेस काढली आणि स्वतःच्या बँकेतील करंट अकाउंटमध्ये जमा करून घेऊन त्या रकमेचा अपहार केला.

Exit mobile version