मिसबाहचे नीट परीक्षेत यश

| आगरदांडा | प्रतिनिधी |
अंजुमन-ए-इस्लाम जंजिरा हायस्कूल व जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी मिसबाह सिराज शेख हिने नीट परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवून संपूर्ण देशातून 150 वा क्रमांक मिळवला आहे. मिसबाहने दंत वैद्यकीय क्षेत्रातील बी.डी.एस. पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षण एम.डी.एस. घेण्यासाठी नीट पीजी परीक्षा द्यावी लागते. या नीट परीक्षेत तिने धवल यश प्राप्त करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ती आता एमडीएससाठी पात्र ठरली असून, शासकीय विद्यालयात तिला सहज प्रवेश मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादी अजून येणे बाकी आहे. मिसबाह ही अंजुमन इस्लाम जंजिरा प्राथमिक शाळा, मुरूड जंजिराची पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे, जिने सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचा किताब पटकावला होता आणि मिसबाहच्या हायस्कूलपर्यंत अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल, मरूडमध्ये सर्वोत्कृष्ट मुलीचा पुरस्कारही मिळविला आहे.

मिसबाहने एसएससी परीक्षेत 93 टक्के गुण मिळविले आहेत. मिसबाहने जेएटी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मालेगाव मधून बारावी उत्तीर्ण केले. मिसबाहचे वडील सिराज शेख हे अंजुमन हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते मुरुड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.

Exit mobile version