| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनीतील आळीअंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना घडली असून, आरोपीवर रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.12) सुमारास येथील स्वामी समर्थ मठाजवळील अल्पवयीन मुलगी आपल्या घरी काम करीत असताना नवीन पोसरी येथील आरोपी तिच्या घरी आला. यावेळी त्याने मुलीला मारहाण करून तिच्याशी गैरवर्तन केले. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या गुन्ह्यातील आरोपीला सोमवारी (दि.12) रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाचकर करीत आहेत.
रसायनीत अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन
