| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर येथील हॉटेल गोल्डन पॅलेस येथे काम करणाऱ्या महिलेबरोबर गैरवर्तन केल्याची घटना घडली. तीन आरोपी हॉटेलमध्ये येऊन खोलीची मागणी करत होते. खोली उपलब्ध नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी अश्लील टिप्पणी करत महिलेबरोबर अयोग्य वर्तन केले. यावेळी उपस्थित साक्षीदारांनाही धक्काबुक्की करत दमदाटी करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
हॉटेलमध्ये महिलेशी गैरवर्तन
