गुहागर एसटी डेपोचा गलथान कारभार

बसेस उशिरा सोडून प्रवाशांची कुचंबना

| चिपळूण | प्रतिनिधी |

गुहागर आगारातून गणेशोत्सव झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या सोडण्यात येणाऱ्या गाड्या दोन-दोन तास उशिराने सोडत आहेत. चालक-वाहक रिकाम्या गाड्या नेतात. चिवेली फाटा, घोणसरे, गुढेफाटा, तांबी, निर्व्हाळ या बसथांब्यावर चालक-वाहक गाड्या थांबवत नाहीत. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी, वृद्ध, व्यापारी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांची कुचंबना होत आहे.

गुहागर आगाराचा अत्यंत गलथान कारभार सुरू आहे. गुहागर-स्वारगेट गाडी 9.15 मि. सोडतात. परंतु, बुधवारी (दि.10) दोन तास झाले तरी गाडी आलेली नव्हती. गुहागर आगरातील नियंत्रण कक्षातील फोन बंद आहे. त्यामुळे संपर्क साधता येत नाही. यामुळे प्रवासाची कुचंबना होत आहे. गुहागरमधून लांब पल्ल्याच्या गाड्यांना कोयनानगर येथे जेवणासाठी थांबा आहे. परंतु, चालक-वाहक मनमानी कारभार करून काशिळ येथे हॉटेलात थांबवतात. गुहागर-स्वारगेट गाडी काशिळला 4 वाजता पोहोचते. डायबिटीस रुग्ण यांना उपाशी बसावे लागते. त्यामुळे त्यांना त्रास होतो. डेपो मॅनेजर गुहागर यांनी चालक-वाहकांची मनमानी थांबवावी, अशी मागणी प्रवासी अनिलकुमार जोशी यांनी केली आहे.

Exit mobile version