हरवलेली तरुणी पालकाच्या स्वाधीन

| पेण | प्रतिनिधी |

पेण बोर्झे येथील गायब झालेल्या तरुणीचा शोध लावून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात पेण पोलिसाना यश आले आहे. ही तरुणी आपल्या कामावरून गायब झाली होती. तिच्या मोबाईलचा शेवटचा लोकेशन ठाणे-मुंब्रा हा होता. त्यानंतर तिचा फोन बंद झाला होता. पेण पोलीस ठाण्यात अशा बाबतची खबर तिच्या मोठ्या बहिणीने दिली होती. खबर मिळाल्या पासून 24 तासाच्या आतच पेण पोलीस ठाण्याच्या भरारी पथकाने पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक समर बेग यांच्या सुचनेनुसार पोलीस हवालदार प्रकाश कोकरे, पोलीस नाईक सचिन व्हासकोटी, पोलीस नाईक अमोल म्हात्रे यांनी हरवलेल्या तरुणीला शोधून काढले आहे. ही तरुणी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आढळून आली आहे. याकामी पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबून तिला शोधण्यात यश मिळविला आणि रात्री उशीरा पेण पोलीस ठाण्यात आणली व तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिली.

Exit mobile version