मुरूडमधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

। अलिबाग । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील उसरोळी बौध्दवाडी येथून 17 वर्षिय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. 14 डिसेंबर रोजी ही मुलगी घरातुन बाहेर पडली परंतु ती घरी परतली नाही. मुलीच्या घरच्यांनी ही माहिती पोलीसांना दिली आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अल्पवयीन मुलीचा तपास मुरूड पोलीस करत आहेत.

Exit mobile version