। पनवेल । वार्ताहार ।
तारा गाव येथील वीस वर्ष महिला घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली आहे. त्यामुळे ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुषमा सुदाम सवारे असे महिलेचे नाव असून तिची उंची साडेचार फूट, रंग सावळा, बांधा सडपातळ आहे. तिच्या हातामध्ये लाल व हिरव्या रंगाच्या बांगड्या, अंगात काळपट रंगाचा कुर्ता व काळ्या रंगाचे सलवार असलेला पंजाबी ड्रेस घातलेला आहे. या महिले बाबत अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय दोरगे 8108167104 यांच्याशी संपर्क साधावा.