पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील खरबाचीवाडी येथील वीस वर्षीय तरुणी कल्पना अंबाजी वाघ ही सावरसई येथून हरवली असल्याची फिर्याद रामी अंबाजी वाघ हिने पेण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कल्पना वाघ ही उंचीने 5.5 फूट, अंगाने मध्यम, कानात धातुचे टॉप, नाकात चमकी, अंगात पंजाबी ड्रेस त्यावर क्रिम कलरची लेगीज व ओढणी सोबत लाल रंगाची बॅग आहे. कंपनीत कामाला जाते असे सांगून घरातून निघून गेली आहे. तरी या वर्णनाची व्यक्ती कोठे आढळल्यास पेण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.जे. घाडगे यांनी केले आहे.