ई-रिक्षांच्या पावत्यांमध्ये घोळ

ठेका ताब्यात घेण्याची स्थानिकांची मागणी

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये सध्या पायलट प्रोजेक्टवर ई-रिक्षाचा प्रकल्प सुरू आहे. श्रमिक हातरिक्षा चालकांनी मागणी करूनदेखील हा प्रकल्प सनियंत्रण समितीच्या आडमुठ्या धोरणामुळे ठेकेदाराला देण्यात आला आहे. 60/40 प्रमाणे हा ठेका नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू आहे; परंतु प्रवाशांना दिल्या जाणार्‍या पावत्यांमध्ये घोळ असल्याची बाब येथील माजी नगरसेवक दिनेश सुतार यांनी निदर्शनास आणून दिली. आजवरच्या या पायलट प्रोजेक्टमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप सुतार यांनी केला आहे.

प्रवाशांना दिल्या जाणार्‍या पावत्यांवर शिक्केच काय, तर साधी तारीखदेखील नाही. तर, माथेरान नगरपरिषदेची मालमत्ता असलेले शिक्के हे ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांकडे मिळाले आहेत. ई-रिक्षाच्या उत्पन्नातून नगरपरिषद व ठेकेदार यांच्यात 60/40 चा करार करण्यात आला आहे. मात्र, या रिकाम्या पावत्यांमुळे नगरपरिषदेचा आंधळा कारभार उघडा पडला आहे.

दिनेश सुतार, माजी नगरसेवक

सारवासारव करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न नसून, नगरपालिका प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन निवारण करीत आहे.

राहुल इंगळे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद
Exit mobile version