शरद पवारांवरचा अविश्‍वास चुकीचा

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले आणि भाजपसोबत राज्यातील सत्तेत जाऊन बसलेत. त्यानंतर अनेक दावे होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट देखील लोकसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपसोबत जाऊ शकतो अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबतचा प्रश्‍न आदित्य ठाकरे यांना एका मुलाखतीदरम्यान केला होता. त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, पक्ष फुटल्यानंतर, ज्यांना निवडणून दिले ते सोडून गेल्यानंतरही इतक्या ताकदीने ते लढत असतील तर त्यांच्यावर अविश्‍वास दाखवणे चुकीचे आहे. तसेच, गेली 5 वर्ष मी शरद पवारांना जवळून ओळखतो. मी या लोकसभा निवडणुकीत त्यांची या वयातील जी जिद्द पाहतोय. ज्यांनी पक्ष फोडला, ज्यांच्यासाठी वयाच्या 80 व्या वर्षी पावसात उभे राहून भाषण करून ज्यांना निवडूण दिले, तेच आता त्यांना सोडून गेले. पक्ष फोडून गेले. पक्ष स्थापन केला, नाव दिले, त्यांनाच सोडून आता राष्ट्रवादी पक्ष दुसरा हा निकाल आला, त्यानंतर त्यांची मनस्थिती काय असेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Exit mobile version