मागासवर्गीय निधीचा गैरवापर

रिपाईंचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच
। खेड । प्रतिनिधी ।
तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बौद्धवाडीच्या नावाने मागासवर्गीय निधी आणून त्याचा गैरवापर केल्याच्या निषेधार्थ बुधवार, 26 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे खेड तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आले सुरू करण्यात आलेले उपोषण दि. 28 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते.
खेड तालुक्यातील भरणे व भडगाव या दोन गावांच्या सीमेवरच एक पुल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या कामासाठी विशेष घटक योजनेतून मागासवर्गीय निधीचा वापर भरणे बौद्धवाडी च्या नावाने करण्यात आला आहे. या पुलाचा मागासवर्गीयांसाठी कोणताही उपयोग नसून, मागासवर्गीयांच्या निधीचा गैरवापर असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टीतर्फे करण्यात आला आहे. हा निधी मिळवण्यासाठी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मागणी केली होती. मागासवर्गीय वस्ती साठी शासनाकडून देण्यात येणारा निधी स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत पूर्वी दिलेल्या इशार्याप्रमाणे रिपाई तर्फे प्रजासत्ताक दिनी उपोषण सुरू करण्यात आले.
खेड तहसीलदार कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सदस्य दादा मर्चंडे, कोकण संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ, तालुकाध्यक्ष शंकर तांबे, शहराध्यक्ष दिपेेेद्र जाधव, मिलिंद तांबे, गणेश शिर्के, सुरेंद्र तांबे, जितेंद्र तांबे, आर.पी. येलवे, सुरेंद्र तथा दादा बोरजकर, विशाल तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व भरणे बौद्धवाडीतील ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झालेले आहेत.

Exit mobile version