मिथीलेशचे यूपीएससीच्या परिक्षेत यश

। मळेघर । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील मोठे वढाव गावचा मिथीलेश प्रमोद म्हात्रे याने यूपीएससीच्या आयएफएस भारतीय विदेशी सेवा या परिक्षेत यश संपादन करुन भारताच्या परराष्ट्र मंत्रालय दूतावासामधे आपली जागा निश्‍चित केली आहे. सध्या केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय व्यापार विभागात त्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाची दखल घेत मोठे वढाव गावातील इंचगिरी रसाळ सांप्रदायाच्या सभामंडपात नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे वाशी विभागाने व संबंध पेण तालुक्यातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मिथीलेशच्या सत्कार समारंभाप्रसंगी प्रमोद भालचंद्र म्हात्रे, दिपक नारायण वर्तक, शुभांगी वर्तक, राकेश वर्तक,नरेंद्र वर्तक,गजानन वर्तक,रविंद्र म्हात्रे, विश्‍वनाथ म्हात्रे, रविंद्र वर्तक त्र्यंबक वर्तक, रामबुवा वर्तक व ग्रामस्थ व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version