। भंडारा । प्रतिनिधी ।
पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घालून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणं भंडार्याचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार कारेमोरे यांना अटक करण्यात आली.
राजू कारेमोरे यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घातला होता. तसेच पोलिसांना शिवीगाळही केली होती. आपल्या व्यापारी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी धिंगाणा घातला होता. याबाबतची वार्ता जिल्ह्यात पसरल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर कारेमोरे यांनी माफीही मागितली होती. मात्र, सोमवारी पोलिसांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी कारेमोरे यांना अटक केली.