| अलिबाग । प्रातिनिधी ।
एका पैशाच्या गट्ठ्यांसह आमदार दळवी यांचा व्हिडिओ समोर झाला आहे. या व्हिडिओमुळे शिंदे गटातील आमदार दळवी मोठ्या अडचणीत सापडले असून, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ समोर आणला आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात या व्हिडिओच्या माध्यमातून दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या या व्हीडीओत सत्ताधारी आमदार दिसतात. हे सत्ताधारी आमदार कोण आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे. या व्हिडीओच्या शेवटी आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याने त्यांचा काय संबंध, त्यांनी हा पैसा आणला कुठून असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे. आमदारांच्या या व्हिडिओमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून आमदार दळवी मोठ्या अडचणीत सापडलेत. याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची दाट शक्यता आहे.







