आमदारांची फक्त बघ्याची भूमिका
| अलिबाग | प्रतिनिधी |
मी अलिबाग मुरुड मतदार संघाचा आमदार आहे.अशा बतावण्या विद्यमान आमदार दळवी वेगवेगळ्या भाषणातून कायमच करत आले आहेत. मात्र, त्यांचाच मतदार संघातील मीठेखार येथील संरक्षण भिंतीचा प्रश्न सोडवण्यास ते अपयशी ठरल्याची चर्चा जोरात सुरू आहे. फक्त बघ्याची भूमिका आमदारांनी घेतल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
शेकापच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार
प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे दरड कोसळून एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गावाला न्याय मिळवून देण्यात येईल. तातडीने दरडग्रस्तांचे स्थलांतर करून संरक्षक भिंत बांधण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. शेकापच्या मार्फत मदतीचा हात दिला जाईल. ग्रामस्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यास प्रशासन व सरकारला भाग पाडू,अशी ग्वाही शेकाप प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांनी दिली.
मिठेखार येथील घडलेली घटना दुर्देवी आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या दोषींवर आक्रमकपणे कारवाई झाली पाहिजे. साळाव-तळेखारच्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. चिखलाचा रस्ता आहे. गरीबांच्या सर्वसामान्यांच्या जीवाची किंमत सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला नाही. सर्वसामान्यांना वेठीस धरणे कदापी सहन करणार नाही.
चित्रलेखा पाटील
प्रवक्त्या, शेकाप
डिलिव्हरी पेशन्ट, सिरिअस पेशन्ट यांना या रस्त्यावरून किती जलद आणि किती सुरक्षित नेऊ शकतो हा प्रश्न आहे. साळाव-तळेखार हा रस्ता नाही तर मृत्यूचा सापळा बनतोय. प्रशासनाला कधी जाग येणार?
मनीष माळी
उपाध्यक्ष, मुरुड तालुका पुरोगामी युवक संघटना
शेकाप







