। महाड । प्रतिनिधी ।
महाड मधील आ.भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री आदिती तटकरे यांचा भरघोस समाचार घेतला. ते म्हणाले महाड-पोलादपूर तालुक्यातील विकासकामे हे माझ्या प्रयत्नातुन आणि पाठपुराव्यातुन झालेली आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.जी कामे केली तीच आम्ही सांगणार, दुसर्याच्या बापाला आमचा बाप आम्ही म्हणत नाही असे आ.गोगावले म्हणाले.
महाड तालुक्यातील 7 महत्वाची काम आ.भरत गोगावले यांच्या माध्यमातून मंजुर केली आहेत. मात्र रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीच ती कामे मंजुर करुन ती बातमी एका वृत्तपत्रात छापून आल्याने याबाबत खुलासा करण्यासाठी आ.गोगावले यांनी सांयकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश महाडीक, विजय सावंत, महाड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल, शहर प्रमुख नितीन पावले, नगरसेवक डॉ.चेतन सुर्वे, युवासेनेचे सिद्धेश पाटेकर आणी शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.







