नुसत्या पाट्या लावून नारळ फोडणारे आम्ही नाही

आ. जयंत पाटील यांचा हल्लाबोल
म्हसळ्यात शेकापचा मेळावा

म्हसळा | वार्ताहर |
विकास कामाचा पैसा कोणाच्या मालकीचा नसून तो तुम्हा-आम्हा जनतेचा असल्याने त्यावर कुठल्याही नेत्याने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा आम. जयंत पाटील यांनी म्हसळा येथे शनिवारी (4 डिसेंबर) दिला.
म्हसळा तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा शेकाप नेते भाईजयंत पाटील यांच्या उपस्थितीत पाचगाव आगरी सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी माजी आम. पंडित पाटील, तालुका चिटणीस संतोष पाटील, श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव, म्हसळा तालुका युवा अध्यक्ष निलेश मांदाडकर, माजी चिटणीस परशुराम मांदाडकर, माजी जि. प. सदस्या गौरीताई पयेर, चिटणीस मंडळाचे सदस्य तुकाराम महाडिक, विनायक गिजे, श्रीपत धोकटे,राजाराम धुमाळ,वसीम कोदरे, जमिर तांबे आदि मान्यवर उपस्थित होते.
म्हसळा तालुक्यात येऊ घातलेल्या मोदक बाबत बोलताना त्यांनी सांगितले की विकास कामाला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र या प्रकल्पबाबत येणार्‍या कंपनीने कंपनीबाबत सविस्तर माहिती येथील शेतकर्‍याला देणे गरजेचे असून कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगार आणि ज्यांच्या जमिनी या प्रकल्पसाठी गेल्या आहेत अशा प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला रोजगार देण्याचे हमीपत्र दिले तरच या प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल अन्यथा आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने लढा देऊ अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली.

अंतुले निस्वार्थी मुख्यमंत्री
देशातील एकमेव निस्वार्थी मुख्यमंत्री म्हणून बॅ. ए. आर. अंतूले यांचा आवर्जून उल्लेख करताना त्यांनी सांगितले एक पैशाच्या टक्केवारीची अपेक्षा न बाळगता अंतूले यांनी पुढील पन्नास वर्षाच्या भविष्याचा विचार करून कोकणाच्या विकासाचा आराखडा तयार केला. अंतुले साहेबांनी ज्यांना मोठे केले त्यांनीच अंतुले साहेबाना खाली खेचण्याचा प्रयत्न केला, याबाबत मी वेळ येईल तेव्हा सविस्तर बोलेन असे सांगून बॅ.अंतुलेच्या कामाचे मी आजही समर्थन करीत असल्याचे निक्षून सांगितले.

येत्या काळात म्हसळा – श्रीवर्धन भागात मुंबई येणार असून शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावात विकू नका, ले.शेकाप पक्ष हा नेहमी सत्याची बाजू मांडणारा पक्ष असून जनतेची बांधिलकी जपणारा पक्ष आहे हे लक्षात ठेवा.
आ.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस

Exit mobile version