सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
शिवसेना कार्यकर्ता संतोष परब मारहाण प्रकरणातील संशयित आम.नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुरु झालेली सुनावणी बुधवारी (29 डिसेंबर) पुन्हा केली जाणार आहे.दिवसभरात सुनावणी दरम्यान,सरकारी वकील,राणे यांचे वकील यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 30 डिसेंबर रोजी मतदान आणि 31डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या पॅनेलचे नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. सतीश सावंत यांनी हा हल्ला नितेश राणे यांनीच घडवून आणला, असा आरोप केला होता. संतोष परब यांनीदेखील आपल्या फिर्यादीत नितेश राणेंचे नाव नमूद केले होते.
दरम्यान, नितेश राणे ङ्गनॉट रिचेबलफ असून, त्यांनी आपल्याला अटक होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नितेश राणे यांचे पिता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा काहीही संबंध नाही, त्यामुळे ते अज्ञातवासात जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी हा अर्ज दाखल केला असून मंगळवारी त्यावर सुनावणी सुनावणी सुरु झालेली आहे.