पोलादपूर भूयारी मार्गासाठी मनसे आक्रमक

पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर अंडरपास रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे त्रस्त नागरिक आणि विद्यार्थी वर्गाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोमवारी केलेल्या स्वाक्षरी आंदोलनानंतर आता लवकरच जनतेसोबत आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मनोदय मनसे शहराध्यक्ष दर्पण दरेकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांना ओलांडता यावा म्हणून पोलादपूर शहराचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान कमानी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 सुरक्षितपणे भुयारी मार्ग करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत एक हजाराहुन जास्त विद्यार्थी अन् नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी मनविसे पोलादपूर तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर अध्यक्ष प्रविण पांडे, तालुका उपाध्यक्ष पंकज कोळसकर, ओंकार जाधव, शहर उपाध्यक्ष सुमित जिमन, आदेश गायकवाड, शहर सचिव निखिल वनारसे, प्रसिध्दी माध्यम प्रमुख गौरव निकवाडे, अखिलेश शिंदे, सागर जगताप, संकेत जगताप, सुरज जगताप, अक्षय शिवदे, आदित्य गायकवाड, संकेत सुतार आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या स्वाक्षरी मोहिमेद्वारे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया या आस्थापनेला देण्यात आलेल्या निवेदनाचा परिणाम न झाल्यास लवकरच सर्वच समाजधुरिणांच्या पाठिंब्यावर बिगरराजकीय प्रकारचे व्यापक आंदोलन छेडण्याचा मनोदय दर्पण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version