सायन-पनवेल महामार्गावर मनसे सहकार सेनेचं आंदोलन
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
कर्नाटक सीमा वादावर प्रतिक्रिया म्हणून मनसे सहकार सेनेच्या कार्यकर्त्यांनी सायन-पनवेल महामार्गावर कर्नाटकात जाणार्या बसेसना काळे फासत आंदोलन केले. यावेळी बसवर जय महाराष्ट्र लिहून घोषणा बाजी करण्यात आली असून, वेळ पडल्यास कर्नाटकात घुसून तुमच्या गाड्या फोडू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.