मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश कुन्नुमल यांचा राजीनामा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश कुन्नुमल यांनीपक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण, तसेच पक्षातील अंतर्गत वादविवाद, गटतट मिटवण्यास असमर्थ ठरल्याने मी नैतिक जबाबदारी स्वीकारत माझ्या पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडे दिला आहे.

आपल्या राजीनाम्यात महेश कुन्नुमल यांनी म्हटले आहे की, अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातील अनेक पदांच्या नियुक्त्या झालेल्या दिसत नाहीत. या सर्व पदांच्या नियुक्त्या राजसाहेबांच्या रायगड दाै-यांच्या आधी करायच्या आहेत. ज्या महाराष्ट्र सैनिकांना पक्षामध्ये पद घेऊन प्रामाणिकपणे पक्षाचे काम करण्याची इच्छा असेल त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हाध्यक्ष यांना संपर्क साधून आपली नावे द्यावीत. मी स्वतः ज्या उप जिल्हाध्यक्ष या पदावर काम करतोय त्याचा तीन वर्षेहून जास्त कालावधी पूर्ण झाला असून, मी पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण, तसेच पक्षातील अंतर्गत वादविवाद, गटतट मिटवण्यास असमर्थ ठरल्याने मी नैतिक जबाबदारी स्वीकारत माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे जेणेकरुन कोणालाही माझा अडथळा येऊ नये.

राजसाहेबांवर असलेल्या निष्ठेमुळे मी यथायोग्य पक्षाचे सामाजिक कार्य आजन्म करतच राहणार आहे. तरी पक्षकार्यात कोणालाही माझा कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाईल. तरी सर्व सुशिक्षित तरुण तरुणींनी पुढाकार घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version