बेरोजगारी, नागरी समस्येबाबत मनसे आक्रमक

| खोपोली | वार्ताहर |

खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आहे. मनसेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले असले तरी बहुसंख्यक तरूण-तरूणी बेरोजगार आहेत. भविष्यात तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी मनसे भविष्यात आक्रमक भूमिका घेईल असा इशारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी खोपोलीत पत्रकरांशी संवाद साधताना दिला आहे.

मनसेचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विजय नानू सावंत यांनी सुत्रे हाती घेतल्यावर रिशीवन रिसार्ट येथील सभागृहात पत्रकारांशी परिसंवाद साधला यावेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अभिषेक दर्गे, सचिव ज्येष्ठ नेते जे.पी.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कर्णूक ,महेश सोगे, संदीप पाटील, महेश पिंगळे,वाहतुक विभाचे संजय तन्न, विद्यर्थीं संघटनेचे खालापूर अध्यक्ष चेतन चोगले आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

खालापूर तालुक्यातील आणि खोपोली शहराची होणार्‍या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करू लागले असून, तरुणांच्या मनातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पक्षांतर्गत फेरबदल करून पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली असून, खालापूर तालुक्यात मनसे मध्ये आलेली मरगळ झटकून नव्याने तालुक्याचा कारभार हाती घेतलेले तालुकाध्यक्ष विजय नानु सावंत यांनी पत्रकारांशी संवाद हा उपक्रम राबवित जनतेच्या मनातील भावना जाणून घेतल्या.

आगामी काळात रोजगार, रस्ते, पाणी यासह अन्य समस्या सोडविण्यावर आमचा भर राहणार आहे. त्याच बरोबर शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी व विकासाला चालना देण्यासाठी पाठपुरावा करु. प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा घेतली जाईल. आगामी काळात मनसे बलाढ्य पक्ष करु.

विजय सावंत
तालुकाध्यक्ष

लोकहिताच्या प्रश्‍नांना वाचा फोडून काम केल्यास मनसेला नक्कीच फायदा होईल व जनतेचे प्रश्‍न ही मार्गी लावता येतील असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील व तालुका अध्यक्ष विजय सावंत यांनी आगामी काळात नोकर भरतीसह शहरातील वाहतूक कोंडी,पाणी प्रश्‍न ,रस्ते असे अनेक प्रश्‍न हाती घेऊन मनसे सत्तेत नसला तरी आंदोलात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असा शब्द यावेळी पत्रकारांना दिला आहे.

तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची वाढती संख्या आहे त्यामुळे तालुक्यात बेरोजगार मेळावा आगामी काळात घेतला आहे या माध्यमातून प्रत्येकाचे बायोडेटा गोळा केले जातील आणि परिसरातील कारखान्यावर त्यांच्या मागणी नुसार स्थानिकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करून तरुणाईला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार देण्यासाठी मनसे भूमिका घेणार आहे त्यासाठी आंदोलन उभारावे लागले तरी चालेल असा इशार मनसे महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अभिषेक दर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

Exit mobile version