मुंबई-गोवा महामार्गाच्या खरडपट्टी विरोधात मनसेची पदयात्रा

| रायगड | खास प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाच्या खरडपट्टी विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. रविवारी (दि.27) पळस्पे ते लांजा अशी तब्बल 84 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आठ टप्यात पार पडणाऱ्या पदयात्रेत मनसेचे सर्व वरिष्ठ नेते रस्त्यावर उतरणार आहेत. रोहा तालुक्यातील कोलाड येथे रविवारी या पदयात्रेचा संगम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे.

रविवारी 27 ऑगस्टला या महामार्गावरुन पदयात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अमित ठाकरे करणार आहेत. तसेच आ. राजू पाटील, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे असे नेते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून एकाच वेळी पदयात्रा सुरु होणार आहे. या पदयात्रेचा संगम कोलाड येथे होणार आहे. त्यानंतर कोलाड येथे सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले होते. चव्हाण यांना ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

Exit mobile version