| खोपोली | वार्ताहर |
आदिवासी वाड्यावस्त्यांवर मेडिकल सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक अजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येची दखल घेत पीएम जनमन योजनेअंतर्गत मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमयू) सेवा सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (दि.10) खालापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तालुक्यासाठी एक मोबाईल वाहन रुग्णालय दिले असून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅथॉलॉजिस्ट, औषधनिर्माता असे पथक असणार आहे. त्याचा सर्वाधिक लाभ आदिवासी भागाला होणार आहे. मोबाईल मेडिकल युनिट उद्घाटन प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक अबुर्ले, स्वप्निल पाटील, कुणाल पालसकर, पंचायत समिती आरोग्य पर्यवेक्षक म्हसकर, स्वाती गावडे यांच्यासह मोबाइल मेडिकल युनिटमधील वैद्यकीय अधिकारी डॉ.आदिती म्हात्रे, औषध निर्माण अधिकारी निकिता चोरमले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विद्या पाटील, आरोग्य सेविका शर्मिला गावंड उपस्थित होते.