। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर एनएमएमटी बसथांब्यावरून चढताना 23 वर्षीय तरुणाचा 50 हजार रुपये किमतीचा आयफोन चोरल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहित सूर्यवंशी हा नॅशनल रेजन्सी, तक्का येथे राहत असून, कॉलेजला जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात आला. मेगाब्लॉक असल्याने पनवेल-ठाणे बस पकडताना गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने त्याच्या खिशातील मोबाईल पळविला. त्याने तक्रार केल्यावर बस कामोठे पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी बसमधील प्रवाशांना तपासले असता, मोबाइल सापडला नाही.







