माणगावमध्ये मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण

| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील युवक युवतींना जिल्हा उद्योग केंद्र आणि क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन च्या समन्वयाने मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणासाठी जिल्हा उद्योग केंद्र अलिबाग चे श्याम बिराजदार, प्रदीप सावंत, प्रथमेश सुतार यांनी प्रशिक्षणार्थीची मुलाखत घेऊन निवड केली तसेच क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा उद्योग केंद्राचे मोहन पालकर यांनी प्रशिक्षणार्थीला जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली व प्रशिक्षणानंतर व्यवसायासाठी महिलांना 35 टक्के सबसिडी व पुरुषांना 25 टक्के सबसिडी भेटू शकते यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची माहिती दिली.

यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थ्यांना माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी अश्‍विनी समेळ, महेंद्र गायकवाड, बाळकृष्ण काप आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या संस्थापिका शितल माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version