| पनवेल | वार्ताहर |
रेल्वे प्रवासात झोपलेल्या आणि गर्दीचा फायदा उठवत मोबाईल चोरून नेणार्या एका चोरट्यास पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वे पोलिसांनी सात मोबाईल हस्तगत केले आहेत. हार्बर रेल्वेमार्गावर मोबाइल चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. दररोज कोणाचा तरी मोबाईल चोरून नेणार्या या चोरट्यांना पकडण्यासाठी पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहे. यादरम्यान रेल्वे प्रवासात झोपलेल्या आणि गर्दीचा फायदा उठवत मोबाईल चोरून नेणार्या राजेश पवार नावाच्या तरुणास पनवेल रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे पोलिसांना सात मोबाइल आढळले आहेत.