| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील साईकृपा ढाब्याच्या समोरील सर्व्हिस रोडवर उभा असलेल्या ट्रकमध्ये चालक झोपला होता. त्याचा फायदा घेत सराईत चोरट्याने त्याचा मोबाईल चोरून नेला होता. तसेच, पंक्चर काढणाऱ्या दुकानात झोपलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा देखील त्या चोराने मोबाईल चोरला होता. त्या सराईत मोबाईल चोराला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पनवेल तालुक्यातील साईकृपा ढाब्याच्या समोरील सर्व्हिस रोडवर उभा असलेल्या ट्रकमध्ये विशाल कुमकर (33) हे झोपलेले असताना चोरट्याने त्याच्या खिशातील 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता. तसेच, टायर पंक्चर काढणाऱ्या दुकानात झोपलेल्या दोघांचे मोबाईल सुद्धा चोरीला गेले होते. त्याबद्दलची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पालीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पालीस निरीक्षक प्रकाश पवार, हवालार अमोल पाटील, विशाल दुधे, महेश पाटील, परेश बोरशे, किरण कराड, संदेश म्हात्रे आदींच्या पथकाने आरोपी तोहिद ताजुद्दीन शेख (21) याला ताब्यात घेतले आहे. त्याचा सहकारी पसार झाला असून त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.







