| रसायनी | प्रतिनिधी |
हिंदुस्तान पेट्रोलियमची रसायनीसह मुंबई, पुणे, सोलापूर आणि उरण, चाकण, शिक्रापूर एलपीजी पाइपलाइन संदर्भात आपत्कालीन प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापन यावर भिंगार येथे मॉकड्रील करण्यात आले.
यावेळी ऑफ साईट मॉकड्रील प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यात एका ग्रामस्थाने 42.2 किमी अंतरावर चेनेज येथील पाईपलाईनवर अनधिकृत जेसीबी खोदकाम सुरू असल्याची तक्रार नियंत्रण कक्षाला केली. त्याचवेळी, सिस्टम अलार्म आढळून आले. सुरक्षा पर्यवेक्षकांना ताबडतोब घटनास्थळी पाठवण्यात आले आणि त्यांनी उत्पादनाचा वास आणि माती विस्कळीत झाल्याची पुष्टी केली, त्यामुळे पाईपलाईन गळती असल्याचे दिसून आले. गळतीची तक्रार नियंत्रण कक्षाला करण्यात आली आणि साइट इन्सिडेंट कंट्रोलर (एसआयसी) ने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आणि ईआरडीएमपी सक्रिय केले. सुरक्षित परिस्थिती सुनिश्चित केल्यानंतर, खड्ड्यातून जास्तीचे उत्पादन काढून टाकण्यात आले आणि जखमी कामगार धोक्याबाहेर असल्याचे निश्चित करण्यात आले. देखभाल पथकाने पिनहोल गळती बंद करून आणि क्लॅम्प बसवून दुरुस्तीचे काम केले. दुरुस्तीनंतरच्या निरीक्षणे आणि एलईएल तपासणीत आणखी गळती नसल्याचे आढळून आले. यावेळी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनायाचे उपसंचालक सुनील ठाकरे, विभागीय आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी उमेश शिर्के, सरपंच रामदास वाघमारे, सचिन हिवरे, उमेश गुंजोम बिपीसीएल, सुशांत पाटील, निलू शर्मा, मोरीनेय देवघरे आदी उपस्थित होते.





