। महाड । वार्ताहर ।
कोंझर गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव तुकाराम डीगे सर यांना 2024 मधील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उपक्रम राबवणाऱ्या नामदेव डीगे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाड तालुक्यातील कुंजर गावात असलेल्या रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव डीगे यांना या वर्षाचा रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. नामदेव तुकाराम डीगे गेली अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. त्याचबरोबर समाज प्रबोधन करण्याच्या हेतून गेले अनेक वर्ष कीर्तनकार म्हणूनदेखील तालुक्यामध्ये प्रचलित आहेत. वृक्ष संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारखे अनेक उपक्रम त्यांनी राबवत जनप्रबोधन केले आहे.
नामदेव तुकाराम डीगे यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या यादीमध्ये नामदेव डीगे यांचा देखील समावेश झाला आहे. प्रकाश अण्णा सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. महाड तालुक्यासह किल्ले रायगड परिसरामध्ये नामदेव डीगे सरांच्या या पुरस्काराबाबत आनंद व्यक्त होत आहे.