| खारेपाट | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील मॉडेल संघ रांजणखार आयोजित रायगड जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत मॉडेल संघ रांजणखार हा यजमान संघ विजयाचा मानकरी ठरला. तर उपविजेता म्हणून ऐ. वन. संघ माणकुले, तसेच तृतीय क्रमांक विदयुत मांडवखार संघ, चतुर्थ क्रमांक मांडवखार स्पोर्ट या संघाने पटकावला. स्पर्धेत उत्कृष्ट शुटर रोहित पाटील माणकुले, उत्कृष्ट डिफेन्डर राजेश मोकल मांडवखार, उत्कृष्ट नेरमन परेश म्हात्रे यांनी उल्लेखीनय खेळी केल्याबद्दल मान्यवरांच्या हास्ते भव्य चषक व पारितोषिक देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे मॉडेल संघ रांजणखार या संघांने सलग 65 वर्षे राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय शुटींग बॉलचे सामणे भरविण्याचा मान मिळविला आहे.