अत्याधुनिक वाहन अपघातग्रस्तांचे वाचवणार प्राण

आता पनवेल मनपाही करणार रेस्क्यू ऑपरेशन
अग्निशमन दलामध्ये अत्याधुनिक व्हेईकल दाखल
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दलाची क्षमता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फायर ब्रिगेड सक्षम होत असून आता अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा मनपाला करता येणार आहे. विशेष म्हणजे शीघ्र कृती वाहन ताफ्यामध्ये सामील झाले आहे. अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी हे देवदूत वाहन वरदान ठरणार आहे.

सहा वर्षांपूर्वी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. त्याच कालावधीमध्ये नगरपरिषदेची फायर यंत्रणा मनपाकडे वर्ग करण्यात आली. तेव्हा मनपाकडे मनुष्यबळाबरोबरच यंत्रसामुग्री त्याचबरोबर बंब यांची कमतरता होती. त्यानंतर अग्निशमन दल सक्षम करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने पावले उचलली. कंत्राटी पद्धतीने फायरमन भरती करण्यात आली त्याचबरोबर सव्वाचार कोटी रुपये खर्च करून तीन वाहने खरेदी करण्यात आले. त्यामुळे साहजिकच अग्निशमन दलाची क्षमता बर्‍याच अंशी वाढली.

पनवेल परिसरामधून महामार्ग जातात. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. या ठिकाणी वाहनांचे अपघात घडतात. त्याचबरोबर काही वाहनांना आग सुद्धा लागण्याची घटना घडते. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्याप्रसंगी मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे यंत्रसामग्रीचा अभाव होता. मात्र राज्य सरकारने मिनी रेस्क्यू व्हेईकल महानगरपालिकेला दिली आहे. विशेष म्हणजे अग्निशमन दलाच्या ताब्यात हे वाहन दाखल झाले आहे. या वाहनाचा देवदूत असा नामोल्लेख केला जातो.

अशी आहे मिनी रेस्क्यू व्हेईकल
रेस्क्यू गाडीत तब्बल 86 युकोपमेंट उपलब्ध असतील. त्यामध्ये 500 लिटर पाण्याच्या टाकी आहे, स्टेपर, कटर, रॉड ,पुल्ली त्या सोबत लिफ्टिंग बॅग, बॅटरी ऑपरेट टूल्स,ब्रिथिग, ऑपरेटिव्ह सेट डी वॉटरिंग पम्प, मल्टी परपझ टूल्स, फर्स्ट मेडिकल किट, ऑपरेशन मेन्टनस टूल्स, रिमोट असे महत्व पूर्ण साहित्य या व्हेईकलमध्ये उपलब्ध असतील. अपघातग्रस्तांना पत्रा कापून त्वरित बाहेर काढता येणे शक्य होईल. त्यामुळे अनेकांचा प्राण वाचू शकेल.

Exit mobile version