। बंगळुरू । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजस फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव घेतला. आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर करत पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली. या अनुभवामुळे आपला देशाच्या क्षमतेवरील विश्वास वाढला आहे. आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहोत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
तेजस हे सिंगल सीटर जेट विमान आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी ट्विन-सीटर तेजस विमानाची सफर केली. यामध्ये पंतप्रधान मोदी मागे बसले होते. या ट्विन सीटर व्हेरियंटचा उपयोग ट्रेनिंगसाठी केला जातो.
भारतीय हवाई दलाने आणखी लढाऊ विमाने आणि हलके लढाऊ हेलिकॉप्टर (LCH) तेस खरेदी करण्याची आणि सुखोई-30 श्रेणीतील विमानांमध्ये सुधारित करण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या लवकरच अब्जावधी डॉलर्सचे संभाव्य करार होण्याची शक्यता आहेत. यातच आज पंतप्रधान मोदी यांनी HAL च्या बंगळुरु येथील प्लांटला भेट दिली आहे.