मोदी सरकारमुळे देशाची घडी विस्कटली

डॉ.मनमोहनसिंह यांचा घणाघात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था।
केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक स्थिती, विदेश निती बिघडली असून. भाजपाचा राष्ट्रवाद हा इंग्रजांच्या फो़डा आणि राज्य करा या धोरणावर आधारीत आहे. या सरकारच्या काळात घटनात्मक संस्था दुर्बल केला जात असल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी केला आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने मनोमहन सिंह यांचा पंजाबी भाषेतला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. साधारण 9 मिनिटांच्या या व्हिडीओत मनमोहन सिंह यांनी त्यांच्या संयमी भाषेत पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजप यांच्यावर जोरदार प्रहार केले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या अर्थिक धोरणांवर मनमोहन सिंह यांनी टीका केली आहे. कोरोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक घडी विस्कटली, बेरोजगारी वाढली आणि महागाईत वाढ झाली, यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे.असेही ते म्हणाले.

गेली साडेसात वर्षे सरकार चालवल्यावर स्वतःच्या चुका कबुल करायला हे सरकार तयार नाही. उलट हे सरकार पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना दोष देत आहे. इतिहासावर दोष ढकलत स्वतःच्या चुका या काही कमी होऊ शकत नाहीत. पंतप्रधान म्हणून मी बोलण्यापेक्षा कामावर भर दिला. – मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान

Exit mobile version