मोदी निघाले अमेरिकेला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा असेल. मोदी वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्कला भेट देण्याची शक्यता आहे. 22 ते 27 सप्टेंबरदरम्यान हा दौरा होण्याची शक्यता आहे. मोदींनी यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये आपला शेवटचा अमेरिका दौरा केला होता. जेव्हा अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ङ्गहाउडी मोदीफ कार्यक्रमाला संबोधित केले होतं.

Exit mobile version