सावरकर स्मारकात मोडी लिपी प्रशिक्षण

। मुंबई । वार्ताहर ।
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 13 जुलै रोजी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा आरंभ दादरच्या सावरकर स्मारकात करण्यात आला. दर रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत हे वर्ग घेण्यात येणार आहेत. आपला इतिहास हा पराभूतांचा नाही, तसा असता तर आपण आज जिवंत नसतो. मात्र आमच्या दहा चुका लपवण्यासाठी खरा इतिहास सांगायचा नाही, अशी परंपरा आपल्याकडे आली. सुनील पवार यांनी मोडी लिपीचे महत्त्व सांगताना आता नव्या सरकारकडे आपण शालेय अभ्यासक्रमात पुन्हा मोडी लिपीचा अंतर्भाव करावा अशी मागणी आपण करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी रणजित सावरकर, सुनील पवार, सुधीर थोरात, प्रतीक पाटणकर उपस्थित होते.

Exit mobile version